NMMS परीक्षा 2020-21 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदेवाडी या शाळेचे घवघवीत यश !!!!
इंदेवाडी हे परभणी तालुक्यातील एक छोटेसे गाव. परभणी शहरापासून अवघे २५ कि.मी. अंतरावर ! यां गावाचे वैशिष्य म्हणजे या गावातील पालक साक्षर ,सुशिक्षित आहेत म्हणूनच कि काय या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे.
आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेचे मुख्याध्यापक ,शा.व्य. समिती चे अध्यक्ष श्री नागोरावजी ज्ञानोबा कच्छवे ,व समितीतील इतर सर्व पालक आणि शिक्षक-विद्यार्थी मित्र श्री.बालासाहेब केशवराव कच्छवे या सर्वांच्या कष्टाचे फलित म्हणजे या वर्षीचा NMMS परीक्षेचा निकाल.
निकालाची हि यशस्वी परंपरा याही वर्षी कायम राहिली ...........
यावर्षाचे गुणवंत विद्यार्थी :-
![]() |
कु.ऋतुजा गोविंदराव कच्छवे |
![]() |
रितेश गणेश कच्छवे |